सोनी मराठी वाहिनीवरील इंडियन आयडल मराठी हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर बघायला मिळत आहे. श्रीवल्ली हे पुष्पा या चित्रपटातील गाणं सध्या तुफान गाजतंय. या गाण्याचा गायक हा सिड श्रीराम असून त्याने तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा भाषेत गाणी गायली आहेत. पहिल्यांदाच एका मराठी कार्यक्रमात श्रीराम गाण सादर करणार असून काही वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या युट्युब चॅनलवर अप्सरा आली या गाण्याचे कव्हर केले होते. ज्याला प्रेक्षकांची विशेष पसंती देखील मिळाली होती. आता खुद्द अजय-अतुल समोर सिडने त्यांचे गाणं सादर केले.
मराठी कार्यक्रमाचे आदरातिर्थ घेऊन आणि इंडियन आयडल मराठीच्या स्पर्धकांची गाणी ऐकून सिडसुद्धा आनंदी झाला आहे. इंडियन आयडल मराठीमध्ये सिड श्रीरामने उपस्थिती दर्शवलेला हा एपिसोड सोमवार, २८ फेब्रुवारी रोजी प्रसारित होणार आहे. मराठी कार्यक्रमात सहभागी होण्याची सिडची ही पहिलीच वेळ असल्याचे समजते.