यशस्वीपणे वजन कमी करून स्लिम व्हायचं असेल तर पौष्टिक अन्नपदार्थ घेणं सर्वात महत्त्वाचं. त्याशिवाय शरीरातले फॅट्स आणि कार्बोहायड्रेटसचे प्रमाण कमी केलं आणि सोबतीला नियमित व्यायाम केला तर स्लिम होणं सोप्पं बनतं.
स्लिम होण्याचं स्वप्न वास्तवात उतरवण्यासाठी काही उपाय
- दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका
- प्रत्येक जेवणात मशरुम्स किंवा चर्बी नसलेले मांस आणि माशांचा समावेश असावा.
- प्रत्येक जेवणातून कर्बोदके आणि ऊर्जा मिळवण्यासाठी कॉर्न, ब्रेड किंवा डाळी,कडधान्य, मटार किंवा बटाटे असावेत प्रत्येक जेवणातून ऊर्जा मिळालीच पाहिजे केवळ ब्रेड किंवा केवळ बटाटे आहारात वापरू नयेत.
- अधिक प्रमाणात तेल, लोणी, सॉस ड्रेसिंग,साखर किंवा गोड सॉस तुमच्या आहारात असता कामा नये.
- गोड पदार्थ खाणे शक्यतो टाळा फळांचा रस सही समतोल प्रमाणात घ्यावा.
- अल्कोहोल सेवनाचे प्रमाण कमी करा अल्कोहोल मुळे शरीरातले फॅट्स वाढतात.