मुंबई : सोने-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करण्यासाठी हीच सूवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यांवर लग्नाचा मुहूर्त येऊन ठेपला आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.
दरम्यान चांदीच्या दरात 2 हजारांनी घट झाली आहे. तर 10 ग्राम सोन्याच्या दरांमध्ये 300 रुपयांची घसरण झालीये. यामुळे चांदीचा दर 66 हजारांवरुन 64 हजार इतका झालाय. आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडींच्या पार्श्ववभूमीवर ही घसरण झाल्याचं म्हंटलं जात आहे.