पुणे: संपूर्ण राज्यभरात चालू असलेल्या मराठा क्रांती मोर्चा आता थेट नागपुरात धडकणार आहे.१४ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात नागपुरात मराठा वादळ पाहायला मिळणार आहे. यासंदर्भात मराठा क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. अधिवेशन काळात प्रश्न न सुटल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अॅट्राॅसिटी कायद्यात बदल करावे आणि कोपर्डीच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाची आहे.