‘रामायण’ हा चित्रपट या दिवसांमध्ये खूप चर्चेत आला आहे. मधु मंटेना हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोण , हृतिक रोशन आणि दक्षिणचा स्टार महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
दरम्यान, हृतिक रोशन या चित्रपटात रावणच्या भूमिकेत दिसून येणार आहे. ‘रामायण’ या चित्रपटाचे बजेट सुमारे 500 कोटी असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण 3 डी तंत्रज्ञान वापरून करण्यात येणार आहे. मधु मंटेना, नील मल्होत्रा आणि अल्लू अरविंद या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हिंदी तसेच हा चित्रपट तामिळ आणि तेलगू भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे .