पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आज एका लिटर पेट्रोलच्या किंमतीत ३३ ते ३७ पैशांनी आणि एक लिटर डिझेलच्या किमतीत २६ ते ३० पैशांनी वाढ झाली आहे.
दिल्ली एक लिटर पेट्रोल १०३ रुपये ८४ पैसे आहे,तर एक लिटर डिझेल ९२ रुपये ४७ पैसे आहे.
काल दिल्लीत एक लिटर पेट्रोल १०३.५४ पैसे मिळत होते. त्याचवेळी एक लिटर डिझेल ९२.१२ रुपये मिळत होते.
कोलकाता एक लिटर पेट्रोल १०४ रुपये ५२ पैसे
आहे, तर एक लिटर डिझेल ९५ रुपये ५८ पैसे आहे.
काल कोलकात्यात एक लिटर पेट्रोल १०४.२३ पैसे मिळत होते. त्याचवेळी एक लिटर डिझेल ९५.२३ रुपये मिळत होते.
दरम्यान, मुंबईत एक लिटर पेट्रोल १०९ रुपये ८३ पैसे आहे, तर एक लिटर डिझेल १०० रुपये ५८ पैसे आहे.गेल्या वर्षी जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यानंतर सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्कमध्ये प्रचंड वाढ केली होती.