फेब्रुवारी महिनाअखेरीपर्यंत मुंबई शहर 100 टक्के अनलॉक होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली आहे. ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. मुंबईतील रुग्णसंख्या दोन दिवसापासून हजाराच्या आत आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या आता नियंत्रणात आल्याने मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. लग्नसोहळे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान सध्या शहरात दररोज 500 पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळून येत असून संपूर्ण शहरात सध्या केवळ एकच इमारत सील आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, येत्या आठवड्याभरात मुंबईत 100 टक्के नागरिकांचं कोरोना लसीकरण पूर्ण होणार असल्याचा दावा पालिकेकडू
न करण्यात येत आहे.