कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून हा संसर्गातून पसरत असल्याने नवी मुंबईत कोणत्याही नागरिकाने सार्वजनिक ठिकाणी वावरताना तीन पदरी अथवा कापडी मास्क घालणे बंधनकारक आहे असे महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी विशेष आदेशाव्दारे निर्देशित केले आहे.
त्याचप्रमाणे विविध कार्यालयांमध्ये, कामाच्या ठिकाणी वावरतानाही मास्क परिधान करणे अनिवार्य असल्याचे आयुक्तांनी सूचित केले आहे. सदरचे मास्क हे केमिस्टच्या दुकानात उपलब्ध असलेले असावेत तसेच घरगुती धुवून वापरण्यायोग्य असलेले मास्कही चालतील, तथापी सदर पुन्हा वापरण्यायोग्य असलेले मास्क स्वच्छ धुतलेले व निर्जंतुकीकरण केलेले असणे आवश्यक असल्याचे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. सदर नियमाचे उल्लंघन केलेले आढळल्यास भारतीय दंड संहिता (1860 चे 48) कलम 188 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावयाची आहे.