कोरोना विषाणूने संपूर्ण जगात कहर माजवला आहे. दिवसेंदिवस संक्रमणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अश्या कठीण काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासंदर्भात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आहारावर भर देण्यात आले असून याविषयी आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी आहाराबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
व्हिटामीन सी पदार्थाचे सेवन करा
आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवविण्यासाठी आहारात व्हिटामीन सी मचे मोठ्या प्रमाणात सेवन करा. यामध्ये फळे आणि भाज्यांचा समावेश करा. उदा. लिंबू, संत्री, किवी, केळी, सफरचंद, फुलकोबी, बटाटे, टोमॅटो, पालक, मटर
हळदीचे दूध सेवन करा
दुधात मोठ्या प्रमाणावर व्हिटामीन असतं त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा ग्लास दूध हळदीसह प्या.
भरपूर पाणी प्या
शरीरातील हायट्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरात घाम आणि मुत्राच्या वाटे टाॅक्सिन बोहेर पडत.
धूम्रपान आणि मद्यपानापासून लांब रहा
मद्यपान असो की धूम्रपान यामुळे शरीरात कोरोनाचे विषाणू मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याचा धोका वाढतो त्यामुळे नशा आणि अल्कहोलिक गोष्टींपासून चार हात लांब रहा