टाळेबंदी शिथिलीकरणाचा तिसरा टप्पा : रात्रीची संचारबंदी मागे राज्यात मॉल्स आणि व्यापारी संकुले ५ ऑगस्टपासून खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम ठेवले आहेत. मॉलमधील उपाहारगृहे, चित्रपटगृहे मात्र बंदच राहतील. व्यायामशाळांना केंद्राची परवानगी, राज्याची मनाई वाहनांतील प्रवासी संख्येत वाढ जिल्हाअंतर्गत प्रवासावर निर्बंध नसतील.
दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्र वगळता इतरत्र आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास आवश्यक असेल. केंद्र सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत शाळा-महाविद्यालये व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातही शाळा व महाविद्यालये बंदच राहतील. मुंबईसह १८ महापालिकांमध्ये निर्बंध लागू. राज्यात प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लागू असलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. हे निर्बंध मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आदी.