देशातील सर्वात मोठ्या बँकेने, म्हणजे स्टेट बँकेने आपल्या वैयक्तिक ग्राहकांसाठी नॉन-होम ब्रान्चमध्ये रक्कम काढण्याच्या नियमांत बदल केले आहेत. यासंदर्भातील सविस्तर माहिती स्टेट बँकेने, काल २९ मे ला आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटद्वारे दिली.
पहा कसे आहेत नवे नियम ?
नव्या नियमानुसार बचत खात्याद्वारे एका दिवसाला आता केवळ २५ हजार रुपया पर्यंतचीच रोख रक्कम काढता येणार आहे. याव्यतिरिक्त चेकद्वारे स्वत:साठी एका दिवसांत केवळ १ लाख रूपयांपर्यंतची रक्कम काढता येईल. तर थर्ड पार्टीसाठी चेकद्वारे एका दिवसांत केवळ ५० हजार रूपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. तुम्हाला माहिती असेलच स्टेट बँक सध्या सकाळी १० ते दुपारी २ या वेळेतचालू आहे आणि बँकेत सध्या ५० टक्केच कर्मचारी कार्यरत आहेत. दरम्यान आता बँकेने नॉन-होम ब्रान्चमधून रोख रक्कम काढण्याच्या नियमात बदल केले.