भारतात डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाईन बँकिंग सुविधेने महत्वाची भूमिका बजावली आहे. डिजिटल इंडियामध्ये, लोक आता लहान ते मोठ्या ठिकाणी पैसे भरण्यासाठी UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) वापरतात. भारतात, UPI गेल्या काही वर्षांत देशासमोर सर्वोत्तम पेमेंट माध्यम म्हणून आले आहे. वर्ष २०२० मध्ये देशभरात १.३ अब्ज व्यवहार UPI द्वारे केले गेले आहेत. यूपीआयची क्रेझ लक्षात घेऊन, ते सोपे आणि सुरक्षित बनवणे अधिक महत्त्वाचे बनले आहे.
दरम्यान,यूपीआयचा वापर झपाट्याने वाढत असल्याने फसवणुकीची प्रकरणेही समोर येऊ लागली आहेत, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. काही फसवणूक करणारे लोक कमी ज्ञान असलेल्या लोकांकडून पैसे फसवून घेऊन याचा फायदा घेतला जात आहे. यूपीआय फसवणूकीची प्रकरणे देशाच्या विविध भागातून येत आहेत.
लिंक पेमेंट :
आजकाल लिंकद्वारे पेमेंट करण्याचा ट्रेंड खूप वाढतो आहे. अनेक वेळा पेमेंट करण्यासाठी लिंक पाठवली जाते. सायबर फसवणूक करणाऱ्यांकडूनही याचा वापर केला जातो. म्हणून, लिंकद्वारे पेमेंट करण्यापूर्वी, त्याद्वारे पैसे देणे सुरक्षित आहे का ते तपासा व नंतर पाठवा.
ओटीपी शेअर करू नका :
फसवणुकीची बहुतेक प्रकरणे केवळ ओटीपीद्वारे होतात. लोकांना कंपनी आणि सरकारकडून वेळोवेळी ओटीपी शेअर करण्याच्या सूचना दिल्या जातात, पण तरीही काही लोक याला बळी पडतात आणि त्यांचा ओटीपी शेअर करतात. या व्यतिरिक्त, अनेक वेळा फसवणूक करणारे तुमच्याकडे बँक अधिकारी बनून ओटीपी मागतात, अशा स्थितीत तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही तुमचा ओटीपी कोणाला देत नाही. ओटीपी देणे म्हणजे तुमच्या खात्यातून पैसे जाणे होय.