अफगाणिस्तानातील तालिबान नेतृत्वाखालील सरकारचे पंतप्रधान मुल्ला अखुंद यांची पहिली मुलाखत समोर आली आहे. आताही अखुंदकडून केवळ ऑडिओ मुलाखत देण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी अफगाणिस्तानच्या शांतता आणि पुनर्बांधणीबद्दल बोलले आहे. ते म्हणाले की आमच्या सरकारमध्ये शांतता परत येईल. अखुंद म्हणाले की, वीस वर्षांच्या युद्धानंतर यश मिळाले आहे.
दरम्यान, अखुंदने ही मुलाखत अल जजीराला दिली आहे ज्यात फक्त ऑडिओ आहे. त्यात ते म्हणाले, “नवीन इस्लामिक सरकारसाठी अफगाणिस्तानच्या जनतेचे अभिनंदन. अमेरिकेबरोबर २० वर्षांच्या युद्धानंतर हे यश मिळाले आहे. मागील सरकारमध्ये काम केलेल्या सर्वांना माफ करण्यात आले आहे. अफगाणिस्तानमध्ये आमच्या सरकारमध्ये शांतता परत येईल. ”
१५ ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी पंजशीर वगळता संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला. यानंतर, ७ सप्टेंबर रोजी तालिबानने अंतरिम सरकारची घोषणा केली. “अफगाणिस्तानमधील हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी मोठी किंमत मोजली आहे,” मंत्रिमंडळ जाहीर झाल्याच्या एक दिवसानंतर अखुंद म्हणाला.