अभिनेत्री अमृता पवार दिसणार झी मराठी वरील या नव्या मालिकेत!

झी मराठी वर ‘ तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तसेच जिजामाता, दुहेरी या मालिकांमधून आपल्या भेटीला आलेली अभिनेत्री अमृता पवार ‘ तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे.

ही नवी मालिका येत्या ३० ऑगस्टपासून सोमवार ते शनिवारी रात्री नऊ वाजता झी मराठीवरून प्रसारित केली जाणार आहे. अमृताशिवाय या मालिकेत अन्य कोणते कलाकार या मालिकेत दिसणार आहेत याची सर्वांना खूप उत्सुकता आहे. या मालिकेचा जो प्रोमो रिलीज झाला असून त्यामध्ये लिहिले आहे की, ‘तयारी स्पर्धा परीक्षेची नव्हे, तयारी संसाराची…!!’

तसेच झी मराठी वर ‘माझी तुझी रेशीमगाठ’,’मन झालं बाजिंद’, ‘ती परत आलीये’ या नव्या मालिका देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.