देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प यंदाही डिजिटल असणार आहे. करोना महामारीमुळे आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या कर प्रस्तावांचे सादरीकरण आणि आर्थिक विवरणाशी संबंधित मोठ्या प्रमाणात होणारी छपाई यावेळी होणार नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अर्थसंकल्पाचे दस्तावेज बहुतांशी डिजिटल स्वरूपात उपलब्ध असतील. भौतिकदृष्ट्या त्याच्या फक्त काही प्रती उपलब्ध असतील.
दरम्यान या वर्षी कोरोना महामारीमुळे पारंपरिक हलवा समारंभही रद्द करण्यात आला आहे. अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजांच्या संकलनाना डिजिटल रुप देण्यासाठी कर्मचार्यांच्या एका लहान गटाला अलिप्त राहावे लागेल.
कार्यक्रमाला अर्थमंत्री, वित्त राज्यमंत्री आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी हजेरी लावतात.