असं असणार मुंबई अहमदाबाद बुलेट स्टेशन

भारतात रेल्वे, मोनो रेल, मेट्रोनंतर आता बुलेट ट्रेनही धावणार आहे. भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टचं काम तितक्यातच वेगाने सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर सर्वात आधी तयार होणारं भारतातील पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन म्हणजे गुजरातमधील सूरत. रेल्वे मंत्रालयाने या स्टेशनचे काही ग्राफिकल फोटो शेअर केले आहेत.डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूरतमधील बुलेट ट्रेन स्टेशनही डायमंडच्या डिझाइनमध्ये आहे.या बहुमजली इमारतीत सेंट्रलाइझ्ड एसी, स्वयंचलित जिने आणि बिझनेस लाऊंज अशा सुविधा आहेत.अगदी एअरपोर्टसारखी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा या सूरत बुलेट रेल्वे स्टेशनवर मिळणार आहे.

दरम्यान या स्टेशनचं काम डिसेंबर 2024 सालापर्यंत पूर्ण होणार आहे.मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट हा देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. जो भारत जपानच्या मदतीने साकारत आहे.तब्बल 508 किमी लांबीचा हा मार्ग आहे. यावर एकूण 12 स्टेशन असणार आहे. यामध्ये साबरमती, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, सूरत, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई यांचा समावेश आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.