तुमचा राजकीय विरोध करणारे, तुम्हाला हिणवणारे लाख असतील. पण त्याहूनही अधिक तुमच्या लढवय्या वृत्तीने प्रेरित झालेले आबालवृद्ध आहेत. अनेक कठीण प्रसंगांवर मात करत आज तुम्ही वयाची ८२ गाठलीत. स्वतः अनेक आवाहनांशी लढताना तुम्ही अनेकांसाठी ‘आधारवड’ झालात. एक असा वड ज्याची उंची कितीही वाढली तरी त्याच्या पारंब्या मात्र जमीनीकडेच असतात. ज्या जमिनीने या वटवृक्षाला मोठं केलं, त्या जमिनीला अर्थात महाराष्ट्राच्या लोकांना आपण कधीही विसरत नाही.
मला जसं राजकारण कळतं तसं मी पाहीलंय साधारण माणूस वयाची साठी गाठली की निवृत्त होतो. मात्र तुमच्या बाबतीत तो अपवादाच ठरलाय. वयाची साठी गाठल्यानंतर तुम्ही दुप्पट जोशाने कामाला लागलात. महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही नेत्याच्या आधी एखाद्या घटनास्थळी किंवा शेकऱ्याच्या बांधावर तुम्ही सर्व प्रथम हजर असता. हा इतर कोणत्याही नेत्याने तुमच्याकडून शिकण्यासारखा गुण आहे.
तुमच्या यशाची गणितं अर्थातच कोणाला मांडता येणार नाही. कारण दुसरा ‘शरद पवार’ होणं कोणालाच शक्य नाही. तुम्ही आजही महाराष्ट्रात तुमचा चौफेर वावर ठेवला आहे. तो असाच अविरत सुरू राहावा आणि ५६ इंच वाल्यांना हा तेल लावलेला पैलवान नेहेमीच भारी पडावा ह्याच आपल्या जन्मदिनी शुभेच्छा!
सुशांत वाघमारे
(लेखन ‘प्लानेट मराठी’वर सोशल मीडिया मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत)