इंग्रजीच्या पेपरला कॉपी; एका प्रश्‍नाच्या उत्तराची २० रुपयांना झेरॉक्स

दहावी शालांत बोर्ड प्रमाणपत्र परीक्षेतील इंग्रजीच्या पेपरला एका प्रश्नाच्या उत्तराची २० रुपयांना झेरॉक्स प्रत विक्रीचा प्रकार शनिवारी तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथे समोर आला. सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा टाकून झेरॉक्स यंत्रासह दोन प्रश्नांच्या उत्तराच्या प्रत्येकी ८० प्रती ताब्यात घेतल्या.इयत्ता दहावी बोर्डाच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेला मंगळवार पासून सुरुवात झाली. शनिवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता. तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथील केंद्रावर परीक्षा सुरु असताना संजय मुरलीधर पालवे याच्या झेरॉक्स सेंटरमधून उत्तरांच्या प्रती विक्री केल्या जात असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली.

दरम्यान, सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने कारवाई केल्यानंतर शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांना कळविले. त्यानंतर श्री. शिंदे तातडीने साक्षाळपिंप्रीत पोहोचले. हवालदार बाबासाहेब बांगर यांनी त्यांना कारवाईचा अहवाल सादर केला. मात्र, पो.िलिसांच्या कारवाईत हाप्रकार समोर आला असला तरी शिक्षण विभागाचा गाफीलपणा या निमित्ताने समोर आला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.