पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, ते कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाहीत तसेच अविश्वास प्रस्तावावर विरोधी पक्षांना पराभवाला सामोरे जावे लागेल असे म्हटले आहे. इम्रान खान म्हणाले की, विरोधकांनी आपले सर्व पत्ते उघड केले आहेत, परंतु त्यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव यशस्वी होणार नाही. कोणत्याही दबावाखाली राजीनामा देण्याचे त्यांनी स्पष्टपणे नाकारले.
ते म्हणाले की, ‘मी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही. मी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळेन आणि आदल्या दिवशी त्यांना आश्चर्यचकित करेन कारण ते अजूनही दबावाखाली आहेत. मात्र, त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. ते पुढे म्हणाले, ‘मी घरी बसेन, असा गैरसमज कोणीही करू नये. मी राजीनामा देणार नाही. चोरांच्या दबावाखाली मी राजीनामा द्यावा का?’ असा सवाल देखील त्यांनी केला.