उद्योगपती रतन टाटा यांना मिळाली कस्टमाइज्ड टाटा नॅनो इलेक्ट्रिक कार

टाटा मोटर्सने काही वर्षांपूर्वी टाटा नॅनो ही कार लाँच करून संपूर्ण ऑटो क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर मागणी कमी झाल्याने कंपनीने ती बंद केली. आता Electra EV ने त्याच नॅनो कारचे इलेक्ट्रिक व्हेरियंट तयार केले आणि रतन टाटा यांना भेट दिली. या कारमधून उद्योगपती रतन टाटा यांनी प्रवास केला. इलेक्ट्रिक ईव्ही कंपनीने या खास प्रसंगाचा फोटो लिंक्डइनवर शेअर केला आहे. यामध्ये उद्योगपती रतन टाटा कारजवळ उपस्थित असल्याचे दिसत आहेत.

“टीम इलेक्ट्रा EV साठी हा एक गौरवाचा क्षण आहे. ही कार १० सेकंदांपेक्षा कमी वेळेत शून्य ते ६० किमी प्रतितास वेग वाढवते. यामध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. या कारबद्दल टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की, यामुळे कारचा खरा अनुभव येतो. आधुनिक ग्राहकांना इको-फ्रेंडली वैयक्तिक वाहतूक प्रदान करण्याच्या आमच्या प्रयत्नात कोणतीही तडजोड केलेली नाही. या कस्टम बिल्ट नॅनो ईव्हीमध्ये 72V आर्किटेक्चर वापरण्यात आले आहे. टिगोर ईव्हीमध्येही हीच पॉवरट्रेन वापरली गेली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.