अनेकांच्या मनावर राज्य कारणारी अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांची आवडती आहे. त्यामुळेच चाहत्यांमध्ये तिची कायमच चर्चा असते. सध्या ऋता ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत झळकत असून ही मालिका सुध्दा तितकीच लोकप्रिय झाली आहे. ऋताने नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती पुन्हा चर्चेत आली आहे. सोबत ऋताने नेमकी राज ठाकरे यांची भेट का घेतली? हा प्रश्नही नेटकऱ्यांनी विचारला.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित ‘दीपोत्सव’ हा कार्यक्रम दरवर्षी शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे साजरा केला जातो. यावेळीदेखील या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी ऋता आणि अजिंक्यने हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऋताला राज ठाकरे यांची भेट घेण्याची संधी मिळाली.