पर्यटन, पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह आज नवीमुंबई येथील तुर्भे,महापे तसेच घणसोली विभागातील एमआयडीसी टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योजकांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान,नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करावरील दंडाच्या रकमेवर सवलत मिळावी या उद्योजकांच्या मागणीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. लवकरात लवकर याबाबत योग्य निर्णय येईल अशी ग्वाही उद्योजकांच्या शिष्टमंडळास दिली.