मुंबई: कफ परेडच्या नागरिकांचे विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात आमदार राजेश राठोड यांनी एक दिवशीय फिरता दौरा करुन स्थानिकांशी संवाद साधला. शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालय, रोजगार, सामाजिक भवन अश्या विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा यावेळी करण्यात आली.
दरम्यान, “समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढून शासन स्तरावर प्रयत्न करुन विविध विषय मार्गी लावणार” असे यावेळी राजेश राठोड म्हणाले. याप्रसंगी मुंबई काँग्रेसचे कुलाबा ब्लॉक अध्यक्ष राजू पवार, महाव्हाॅईसचे संस्थापक रवी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते राजेश चव्हाण, शोभा राठोड, गोविंद रामावत, संदीप चव्हाण, मनूर राठोड आदी उपस्थित होते.