‘गल्ली बॉय’ या चित्रपटातील अभिनेता धर्मेश परमार उर्फ एमसी तोड-फोड याचं निधन झालं आहे. एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. धर्मेशने म्हणजेच एमसी तोड-फोडने वयाच्या २४ व्या वर्षी या जगातून निरोप घेतलेला आहे. त्याच्या मृत्यूची बातमी समोर येताच रणवीर सिंह आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी धर्मेशला श्रद्धांजली दिली. धर्मेश परमारने रणवीर सिंहच्या गल्ली बॉय चित्रपटाच्या साउंड ट्रॅकसाठी त्याचा आवाज दिला होता. तसेच तो एका स्वदेशी नावाच्या सिंगिंग बँडचासुद्धा भाग होता.
स्वदेशी बँडने धर्मेश परमारच्या मृत्यूची माहिती दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार धर्मेशचा म्हणजेच एमसी तोड-फोडचा मृत्यू कार अपघातात झालेला आहे. परंतु धर्मेश परमारच्या कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का आहे. दुसरीकडे रणवीर सिंहने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर धर्मेशला श्रद्धांजली दिली आहे.