मुंबई : मुंबई बँकेने कार्यक्षेत्राबाहेर बीड जिल्ह्यात बनावट दस्तऐवज तयार करून 27 कोटी रुपयाचे कर्ज बेकायदेशीर दिल्याचे विशेष लेखापरीक्षक यांच्या दि.२२/०५/२०२२ रोजीच्या अहवालात निष्पन्न झाले आहे. यातील सर्व संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश विभागीय सहनिबंधक यांनी दिनांक ०८/०६/२०२२ रोजीच्या पत्रानुसार मुंबई पोलिसांना देऊनही त्याबाबत अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही.
दरम्यान, या उघड भ्रष्टाचाराप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते एडवोकेट अमोल मातेले यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांना दिला आहे.