चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चिमूर क्रांती लढा अजरामर आहे. स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. आज चिमूर क्रांती दिनानिमित्त स्मृतीस्थळाला भेट देऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शहिदांना आदरांजली वाहिली.
दरम्यान, चिमूर क्रांती हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक सोनेरी पान आहे.चिमूरच्या लढाईने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील करो या मरो आंदोलनाची भूमिका आणि दिशा ठरवली होती. १६ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतिकारकांनी युनियन जॅक उतरवून भारतीय तिरंगा फडकवला. जिथे संपूर्ण देश गुलामगिरीत होता, तिथे चिमूर शहर सलग तीन दिवस मुक्त होते