चेहरा मॉइश्चरायईज करण्यासाठी घरगुती उपाय.

चेहरा सुंदर दिसण्यासाठी बाजारात अनेक सौंदर्य प्रसादने आहेत. पण यांच्या वापरामुळे आपल्या चेहऱ्यावर कधी कधी विपरीत परिणाम होतो. तर काही महिलांना कामामुळे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी चेहऱ्यासाठी आपल्याला घरगुती उपाय खूप उपयुक्त ठरतात व या उपायांमुळे चेहऱ्याला काही अपाय होय नाही. चेहरा सुंदर आणि टवटवीत बनवण्यासाठी खालील काही घरगुती उपाय आहेत.

१) कोरफड : घरच्या घरी चेहरा सुंदर आणि टवटवीत बनवण्यासाठी कोरफड हा सर्वोत्तम उपाय आहे. कारण, त्वचा तेलकट असो वा कोरडी त्यासाठी कोरफड उपयोगी ठरते. यामध्ये असणारे बीटा-कॅरोटीन, विटॅमिन सी आणि ई त्वचेला स्वस्थ ठेवतात. यासाठी कोरफडीचा गर चेहऱ्याला लावा. आणि काही वेळाने धुवून टाका. याने चेहऱ्याला चांगली चमक येईल.

२)मध : त्वचेचं क्लिंन्जिंग करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे मध याच्या वापरामुळे त्वचा कोमल बनते. आणि त्वचा उजळतेही यामुळे, चेहरा, हाता-पायाची चमक कायम राहते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.