मानवी शरीर अदभुत आहे शरीररचनाशास्त्रात सजीवाच्या शरीरातील अवयवांचा आकार, रचना व कार्य, तसेच त्यांचे परस्परांशी संबंध यांबाबतचा अभ्यास केला जातो.
1) मजबुत फुफ्फुस
आपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाही येत. जर फुफ्फुसाला खेचुन लांब केलं तर ते टेनिस कोर्टचा एक हिस्सा पुर्ण व्यापुन टाकेल.
2) अशी कोणतीही फॅक्टरी नाही
आपले शरीर दर सेकंदाला २५ करोड नविन सेल बनवते. दररोज २०० अब्जापेक्षा जास्त रक्त कोषिकांचे उत्पादन करते.सतत शरीरात २५०० अब्ज रक्त कोषिका असतात. रक्ताच्या एका थेंबात २५ करोड कोषिका असतात.
3) लाखो किलोमीटर चा प्रवास
मानवाचे रक्त शरीरात दररोज १९२००० किलोमीटर चा प्रवास करत असते. आपल्या शरीरात साधारण पणे ५.६ लीटर रक्त असते. जे दर २० सेकंदाला एकवेळा संपुर्ण शरीराचे भ्रमण करते
4) धडधड
तंदुरुस्त व्यक्तीचं ह्रदय दररोज १००००० वेळा घडकतं. वर्ष भरात ३० करोड पेक्षा जास्त वेळा धडकतं. हृदयाच्या पंम्पिग चा दाब एवढा जास्त असतो की,रक्ताची चिळकांडी ३० फुट वर उडु शकते.
5) सर्व कॅमेरे आणि दूर्बिणी निष्फळ
मानवाचे डोळे एक करोड रंगांना ओळखुन लहानातला लहान फरक ओळखु शकतात. अजुनपर्यत जगात अशी कोणतीही मशीन नाही जी यांच्या बरोबर स्पर्धा करु शकेल.