ठाणे: ४ कोटी वृक्ष लागवडीची मोहीम सुरु झाली असून ७ जुलैपर्यंत ती चालणार आहे. ठाणे जिल्ह्यात ९ लाख ३३ हजार २८७ इतकी रोपे लावण्यात आली आहेत. जिल्ह्याने १६ लाख ४१ हजार रोपे लावण्याची तयारी ठेवली आहे.
वन विभागाने आत्तापर्यंत ६ लाख ९४ हजार ३८४ रोपे लावली असे उपमुख्य वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले. सामाजिक वनीकरणने ४२ हजार ९३८ रोपे तर महानगरपालिका व नगर परिषदांनी मिळून ८८ हजार ६६५ रोपे लावली.
महसूल, कृषी विभाग व इतरांनी मिळून ३१ हजार ८४० , उद्योग, पोलीस यांनी मिळून २४५० तर ग्रामपंचायतीनी मिळून ७१ हजार ३७४ इतकी रोपे लावली.