जुन्या मुंबईचे शिल्पकार आगरी; ज्येष्ठ लेखिका नीला उपाध्ये यांचे व्याख्यान

मुंबई : जुन्या मुंबईचे शिल्पकार, चुनाभट्टया आणि मिठागरवाले आगरी या विषयावर ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानातून त्या आगरी समाजाचा चुनाभट्टी व मिठागरांचा व्यवसाय व त्यांचे मुंबईच्या जडणघडणीत असलेले योगदान यावर विवेचन करणार आहेत. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील कुमारस्वामी सभागृहात बुधवार दि. ४ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी यांनी लिहिलेल्या तसेच बँक ऑफ अमेरिकेच्या सहयोगाने छापण्यात आलेल्या :Lime-kilns, Salterns & the Agris” (the past & the present) या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. 700 रुपयांचे हे पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने रसिकप्रेक्षकांना 600 रुपयांना उपलब्ध होणार आहे.

नीला उपाध्ये या पूर्णवेळ पत्रकारिता करणाऱ्या पहिल्या मराठी महिला पत्रकार असून गेली ५० वर्षे त्या मुंबई विद्यापीठाच्या जनसंवाद (मास कम्युनिकेशन) या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. 1970 पासून तब्बल 36 वर्षे त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्रासाठी पत्रकारिता केली. पत्रकारितेसाठी त्यांना अनेक पुरस्कार तसेच सरकारकडून मानपत्रे मिळाले. सत्यजित राय यांचे मराठीतील पहिले चरित्र उपाध्ये यांनी लिहिले. याव्यतिरिक्त जवळपास वीस पुस्तके लिहिली, संपादित तसेच भाषांतरीत केली आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.