‘मन झालं बाजिंद’ ही झी मराठी वरील नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा टीजर प्रदर्शित झालेला असून, ही मालिका नेमकी कशी असणार आहे याबद्दल प्रेक्षकांना फार उत्सुकता लागली आहे.
या मालिकेत बारामतीचा अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही नवी जोडी प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या मालिकेचे दिग्दर्शक अनिकेत साने आहे. या मालिकेची निर्मिती वाघोबा प्रॉडक्शन यांनी केली आहे.
बारामतीचा अभिनेता वैभव चव्हाण याने स्वराज्य जननी या मालिकेत मुहम्मद तर्की हे पात्र साकारले होते. विशेष म्हणजे वैभवने अभिनय क्षेत्रासाठी आय सी आय सी आय बॅंकेतील जॉब देखील सोडला होता.
मालिकेत वैभव आणि श्वेता हे राया आणि कृष्णा असे पात्र साकारणार आहेत. या दोघांची बेधुंद, बेभान अशी प्रेमकहाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे.