तर मराठी शाळेत जर्मनी भाषाही शिकवली जाईल

शिक्षणाच्या क्षेत्रात असलेली आव्हाने लक्षात घेऊन त्यासाठी जर्मन भाषेचा आणि तेथील तंत्रज्ञानाचा वापर शालेय शिक्षणात होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणात जर्मन भाषा शिकवण्यासाठी नक्कीच विचार केला जाईल, असे मत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज व्यक्त केले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग म्हणून राज्यातील एक हजारांहून अधिक शाळांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी सकाळ माध्यम समूह, जर्मन दूतावास व म्युनिचच्या महाराष्ट्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्लोबल महाराष्ट्र’ उपक्रमाअंतर्गत मागदर्शनपर अशा दुसऱ्या टप्प्यातील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी गायकवाड बोलत होत्या.

राज्यातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. कार्यक्रमात जर्मनीतील वाणिज्य दूतावासात कार्यरत असलेले मराठी अधिकारी डॉ. सुयश गायकवाड यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षणमंत्र्यांनी जर्मन भाषा शालेय शिक्षणात शिकवली जावी, यासाठीचा प्रस्ताव डॉ. गायकवाड यांनी मांडला. त्यावर मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, की जर्मन ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे; पण इंग्रजीही महत्त्वाची असल्याने आपण ती पहिलीपासून सुरू करत आहोत. त्याच पार्श्वभूमीवर येत्या काळात आंतरराष्ट्रीय भाषा शालेय शिक्षणात शिकवता येईल, असेही त्यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.