तीर्थस्थळांना भेट देणारी ‘काशी महाकाल एक्सप्रेस’ नावाने नव्या रेलगाडीचे उद्घाटन झाले आहे.

काशी महाकाल एक्सप्रेस

  • तीर्थस्थळांना भेट देणारी ‘काशी महाकाल एक्सप्रेस’ नावाने नव्या रेलगाडीचे उद्घाटन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते या गाडीचे उत्तरप्रदेश राज्याच्या वाराणसी या शहरात उद्घाटन करण्यात आले.
  • भारतीय पुराणात आणि हिंदू समाजाच्या संस्कृतीत आदराचे स्थान असलेले ‘शंकर’ देव ह्यांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी तीनला जोडणारी ही रेलगाडी आहे. इंदौर (मध्यप्रदेश) नजीक ओंमकारेश्वर, उज्जैन (मध्यप्रदेश) येथील महाकालेश्वर आणि वाराणसीतले काशी विश्वनाथ या ज्योर्तिलिंगाचा प्रवास या गाडीच्या माध्यमातून शक्य होणार आहे.
  • तेजस गाडीनंतर, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या माध्यमातून चालवण्यात येणारी अशी सार्वजनिक क्षेत्रातली ही तिसरी कॉर्पोरेट म्हणजेच खासगी रेलगाडी आहे.

  • कमी आवाजातले संपुर्ण वेळ असे भक्तीमय संगीत, प्रत्येक कोचमध्ये खाजगी गार्ड, फक्त शाकाहारी जेवण आणि थर्ड एअऱ कंडीश्नर कोच ही काही वैशिष्ट्ये आहेत.
  • वाराणसी आणि इंदौर या शहरांदरम्यान आठवड्यातून तीन वेळा ही गाडी धावणार आहे.
  • वाराणसी आणि इंदौर दरम्यानचे 1131 किलोमीटरचे अंतर ही गाडी 19 तासांमध्ये कापणार.
  • महाकाल एक्सप्रेसमध्ये देवासाठी एक जागा कायम आरक्षित ठेवण्यात आली आहे.
  • भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच देवासाठी एखादी जागा आरक्षित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र यावर अंतिम निर्णय़ होणे बाकी आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.