सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अनुपम खेर आणि विवेक अग्निहोत्रीचा सुपरहिट चित्रपट ‘द कश्मीर फाईल्स’ची चर्चा आहे. अनुपम खेर यांचा हा चित्रपट प्रमोशनशिवाय थिएटरमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक येत आहेत. सिनेमाचा प्रत्येक शो हाऊसफुल दिसत आहे. विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि कहाणी कोणती जशीच्या-तशी प्रेक्षकांसमोर मांडली आहे.त्यांनी कधीच कोणाला घडलेल्या गोष्टी ना सांगितल्या ना कोणाला चुकीच्या दाखवल्या. हा सिनेमा पाहिल्यावर थिएटरमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दिसतात. या चित्रपटाची चर्चा दिवसेंदिवस वाढतच आहे. 14 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 3 दिवसांत 25 कोटींहून अधिकचा आकडा पार केला आहे.
दरम्यान अशा परिस्थितीत, चाहते OTT वर हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर, हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची घोषणा अद्याप झालेली नाही.