देशात या कोरोना विषाणूची दुसरी लाट अजूनही सुरूच आहे. गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूची २७ हजार २५४ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर २१९ लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. देशात या कोरोना विषाणूच्या आजारामुळे आतापर्यंत ४ लाख ४२ हजार ८७४ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना ॲक्टिव रूग्णांची आकडेवारी अजूनही वाढतच आहे. सध्याच्या परिस्थितीत भरतातील रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट ९७.८२% आहे.
मुंबईत गेल्या २४ तासात ३५४ कोरोना रुग्ण :
दरम्यान, गेल्या २४ तासात मुंबईत ३५४ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या समोर आली आहे. तर १८८ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत ७,११,७४२ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सध्याच्या परिस्थितीत मुंबईतील रिकव्हरी रेट ९७% आहे. तर मुंबईत दिवसाला कोरोना वाढीचा दर ०.०६% आहे.तर सध्या मुंबईत ४८२३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.