भरून गेलीय डायरीअन भरून गेलंय राख टाकायचं पीकदानआताच जाळले आहेत मीअर्धकच्चे जळालेले विचारांचे धूटुककि जे जळाले नव्हते सिगारेट बरोबर…दाबून टाकले आहेत वा विस्कटुन टाकले आहेत,जे विझले नाहीत तेज्याचे तुकडे अजून पडून आहेत तसेच.बस एक दोन कश बाकी आहेतज्यांचे मिसरे सहज राहून गेले होते…
काही अश्या विसरून गेलेल्या ओळ्याकि ज्या ओठावरती गुणगुणत ठेवल्या होत्यात्यातुन अजून धूर निघतो आहे सिगारेटचाती, सिगारेटची राख माझ्या ब्रॅण्डची नाहीम्हणून खासुन राखेच्या पीकदानात घासतविझवून टाकली आहे…
पत्त्याने कापलेली हाताची बारीक नसआणि त्यातून टपकणाऱ्या रक्ताचीश्याइ सुकून गेली आहे,आभाळात चंद्राचे निघणारे छीलटेरात्रभर जागून छीलट्या छीलट्यानेफेकून दिलेय मी उतरत्या रात्री प्रमाणे ….
मोढलेल्या पेन्सिलचे छिलकेविचारांच्या गदारोळात तुटक तुटकतुटत राहिले आहेत रात्र रात्रसिगारेटच्या राखेच्या पीकदानातकवितेच्या काही ओळीतते लाईटरचे हलकेसे ज्वाळज्याने काही नंबर, नाव जाळले आहेत मी …
धूर अजून आठवणींशी झटतो आहेउलटत पुलटत सर्व रवीवारशी भांडतकाही कवितेच्या ओळी विसरलो असेल तरत्यांचे कश ओढून घेऊ म्हणतोयतलब लागली आहे आताधुरासोबत कवितेच्या ओळी लिहण्याची …
– सचिन जाधव