मुंबई | राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त “श्वास” या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या आगामी चित्रपट ‘नदी वाहते’ या मोशन पोस्टर नुकतेच लाँच झालाय . या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असून येत्या सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्याच्या काळात आपल्या गावातली नदी टिकवणे, ती वाहती ठेवणे हे मोठे आव्हानच आहे. नदीसाठी केवळ मोर्चे काढून, आंदोलनं करून भागणार नाही. तर, नदीचा योग्य पद्धतीनं वापर करणं ही काळाची गरज आहे, या आशयसूत्रावर ‘नदी वाहते’ बेतला आहे. संवेदनशील विषय, कोकणाचा नयनरम्य पार्श्वभूमी या चित्रपटाची, उत्तम कलाकार ही या चित्रपटाची वैशिष्ट्यं आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि झी गौरव पुरस्कारांत या चित्रपटाला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मोशन पोस्टरमधूनही चित्रपटाचं वेगळेपण अधोरेखित होत आहे.
