replica uhrenslot gacor slot पाऊलं चालत होती, जीव तिच्यात अडकलेला… swiss replica watches

पाऊलं चालत होती, जीव तिच्यात अडकलेला…

तो नुकताच परगावी नोकरीला लागलेला आणि ति अजून कॉलेजमध्ये शिकत होती. रूम ते ऑफिस आणि ऑफिस सूटलं की रूम हेच काय ते त्याचं रुटीन. ऑफिस मध्ये कोण बॉसच्या पुढे पुढे करतं, आज कसं त्याचं क्रेडिट त्याला दिलं गेलं नाही ते अगदी रुमवरील बाथरूम फिनाईल टाकून साफ केलं असं सगळं काही तो तिला कॉल किंवा व्हाट्सएपवर सांगायचा. ति कॉलेजमध्ये मित्र मैत्रिणींमध्ये मिसळायची. त्यांच्यासोबत कधी ट्रेकिंग तर कधी विकेंड ट्रिप्स. कधी नातेवाईकांची लग्ने. त्याचा संध्याकाळी कॉल यायचा, दिवसभर तसा काही खास संपर्क नसायचा. तिच्या कॉलेजमधील किस्से कधीकधी त्याला अगदीच बालीश वाटायचे. तरी तो ऐकायचा, हम हम करायचा. त्याचा इतका काही खास रिस्पॉन्स येत नाहीये हे तिलाही जाणवायचं. तो देखील ऑफिस मधील गोष्टी सांगू लागल्यानंतर तिला कधीकधी अगदीच रटाळ वाटायच्या. त्यालाही ते जाणवायचं. पूर्वीसारखं दोघांचे विषय जुळत नव्हते, कॉमन किस्से नव्हते. कधी तो दमलेला असायचा तर कधी ती. यातून अंतर वाढत चाललेलं. त्यात तिचा कॉलेजचा एक मित्र तिच्याशी जवळीक करतोय हे त्याला जाणवू लागलं आणि त्यावरून वाद होऊ लागले. तिला मित्राला सोडायचं नव्हतं कारण दिवसभर तो मित्र एकमेव तिच्यासाठी सोबत होता. याला ते सहन होत नव्हतं कारण दोघांची वाढती जवळीक त्याला इनसिक्युअर करत होती.फोनवरून शब्दाला शब्द वाढू लागले, भांडणे टोकाला जावू लागली. नात्यातील पूर्वीचा गोडवा संपला. एकदिवस सुट्टी काढून तो तिच्याकडे आला. तिचं वागणं त्याला अनोळखी वाटू लागलं. जिला सोडून तो नोकरीवर गेला हि ती नव्हतीच. तो जिव्हाळा नव्हता की डोळ्यांमध्ये ओलावा नव्हता. त्याला लक्षात आलेलं की तिला आता नात्यातून मुक्त व्हायचंच, तिची वाट कधीच बदलली आहे. त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला, डोळ्यातून टचकन पाणी आलं, एकाचवेळी प्रचंड राग, प्रेम,नाराजी,हतबलता सगळं काही उफाळून आलं. तिच्या गालाचा गालगुच्चा घेऊन त्याने चेहरा फिरवला. पाऊलं चालत होती, जीव तिच्यात अडकलेला… – अभिनव बसवर

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Replika Órák - Olcsón Rolex replika órák Minősége Óra Webáruház Akciós