त्यांना समानतेचा अधिकार काय असतो ? हे कळत देखील नव्हते. कळणार तरी कसे, तालुका, गाव सोडून दुर तांड्यावर रहायचं आणि जिवनाचा गाडा ओढायचा. शिक्षणाचा गंध येथपर्यंत पुर्णपणे अजूनही दरवळला नाही म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.
शिक्षणापासून वंचित असुनदेखील हा समाज डोळसपणे पाहीलं तर प्रत्येक बाबतीत सरस ठरतो.
आपली बोली भाषा सहजपणे जपत मराठी भाषा बोलताना आपल्या मनाचा ठाव घेण्याची नैसर्गिक लकब. त्याबरोबरच
यांनी आपली पिढ्यान् पिढ्याची संस्कृती पेहरावातुन जपलेली देखील आपल्याला पहायला मिळते
.
बऱ्याच प्रमाणात (अंध)श्रद्धाळू आणि मनाने हळवा असणारा हा आपला बंजारा समाज…..!
वैविधततेने नटलेल्या या समाजातील मला ठळकपणे दिसलेला एक पैलू तो म्हणजे बंजारा समाजातील स्त्री आणि त्यांची पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून संसाराला हातभार लावण्याची त्यांची जिद्द.
शिक्षणापासुन वंचित असलेल्या स्ञिया आणि शिक्षण घेऊन शिक्षणातून काहीच बोध न घेतलेल्या स्ञिया हा मुलभूत फरक आपल्याला पहायला मिळेल.
तालुक्याचा आठवडी बाजार असो कि, उसतोडीची टोळी या स्ञिया मेहनतीमधे पुरूषांपेक्षा कुठेही कमी दिसत नाहीत.
स्ञी पुरूष समानता वगैरे मी वाद किंवा संवाद किंवा कोणत्याही प्रकारची तुलना मांडत नाहीये पण,
“अधिकार फक्त जाणण्यापेक्षा न जाणता तो मिळवणे आणि जबाबदारीने पुर्ण करणे हा व्यावहारिक दृष्ट्या समानतेच्या भांडणात न भांडता मिळवलेला विजयच म्हणावा लागेल.”
आज स्त्रीया शिक्षण घेत आहेत यात बंजारा समाज देखील आता मागे राहीला नाही अशाच कर्तत्वान, मेहनती स्ञीयांनी सामाजिक जाणिवेचे भान ठेवून शिक्षणासहीत राजकारण समाजकारण करत या देशाचे नेतृत्व करावे येवढीच प्रामाणिक इच्छा……!
– योगेश बबनराव शिंदे