बेलाला बिली, सरफळ, बेलपत्रं, कुलम्बाला, मालुरा शिवद्र त्रिदल, त्रिपत्र अशी विविध नावे आहेत. वनस्पतीशास्त्रात बोलला “एजल् मारमेलॉज’ म्हणतात.
बेलाचे औषधी उपयोग-
१) कफ, वात, पित्त या त्रिदोषांचा नाश करण्याचे सामर्थ्य बेलांच्या पानात आहे.
२) ऍमिबिक डिसेंट्री, आव झाल्यास बेलफळाचा गर त्यावर उत्तम उपाय आहे.
३) बेलफळाचा मुरंबा करून रोज थोडा खाल्ल्यास आवेमुळे होणारी पोटदुखी थांबते.
४) मेंदूवर आलेला ताण कमी करण्यासही बेलाच्या पानांचे पाणी रोज घेतल्यास त्याचा फायदा होतो.
५) मेंदूची थकान कमी होते, तापामध्ये रोगी बडबड करत असेल तर बेलाची पानं पाण्यात ४ तास भिजत घालून ते पाणी रोग्याला प्यायला देतात.
६) नायटा, इसब यासारख्या त्वचा रोगांवर बेलाची पानं उपयोगी पडतात.
७) वारंवार ताप येत असेल तर बेलाच्या मुळांचा आणि सालीचा काढा प्यायल्यास ताप येत नाही.
८) बेलाचे मूळ “दशमुळांपैकी’ एक मूळ आहे.
९) बेलाचा प्रमुख गुणधर्म म्हणजे शरीरातील वात, गॅसेस यांचे नियमन करणे. यासाठी तांब्याच्या भांड्यात पिण्याचे पाणी घेऊन त्यात रात्रभर बेलाची पाने भिजत घालून सकाळी त्यातली पाने काढून टाकून ते पाणी प्यावे.
१०) पोटात कृमी झाल्यास बेलाच्या पानांचा रस द्यावा.
११) आव, ऍमेबिक डिसेन्ट्री झाल्यास बेलफळातील गर द्यावा, किंवा कोवळ्या बेलफळाचा गर, आंब्याची कोय यांचा काढा साखर व मध घालून द्यावा यामुळे ओकाऱ्याही थांबतात, या आजारात कधी कधी सौचावाटे रक्त पडते.
१२) त्यासाठी बेलफळ भाजावे, त्यातला लहान सुपारीएवढा गर काढून त्यात गूळ घालून दिवसातून तीन वेळा द्यावे.
१३) दिवस गेलेल्या स्त्रियांना अतिसार झाल्यास सुंठ, बाळबेल यांचा काढा, जवाचे पीठ घालून द्यावा.
१४) रक्तातिसार, बद्धकोष्ठ / मलावरोध यावर बाळबेलाचे चूर्ण गुळाबरोबर द्यावे किंवा बेलफळाचा मुरंबा खावा.
१५) आम्लपित्त झाल्यास आणि त्यामुळे घशात जळजळ असेल तर बेलांच्या पानांचा रस चमचाभर दिवसातून 4-5 वेळा घ्यावा, किंवा बेलाची पाने पाण्यात टाकून 4 तासांनी ते पाणी प्यावे.
१६) उष्णतेमुळे तोंड आल्यास, लाल झाल्यास बेलफळ फोडून पाण्यात कढवावे व त्यात पाण्याने गुळण्या कराव्यात किंवा बेलाच्या पानाच्या गुळण्या कराव्यात.
१७) अंगात शक्ती येण्यासाठी बेलफळाचा अर्क काढून तो खावा आणि त्यावर गाईचे दूध प्यावे.
१८) कधी कधी अतिश्रमाने मेंदूवर ताण पडतो, बुद्धी काम देईनाशी होते, अशा वेळेस बेल आणि दुर्वा पाण्यात टाकून चार तासानंतर ते पाणी सतत घ्यावे म्हणजे मेंदूला आलेला ताण हलका होतो.
१९) हे पाणी वेडसर मुलांना रोज दिले तर त्यांच्यात बऱ्यापैकी प्रगती दिसून येते. अभ्यासात कमी प्रगती असणाऱ्यांवरही हा प्रयोग करावसाय काहीच हरकत नाही.
२०) मेंदूचे सर्व प्रकारचे आजार, कंप, वेड, तापातील बडबड, मेंदूच्या अशक्ततेमुळे, मानसिक आघातामुळे मधुमेह झाला असेल तर या सर्वांवर बेल व दुर्वायुक्त पाणी प्यावे. याने रक्तशुद्धीही होते.
२१) काही कारणाने बहिरेपणा आला असेल तर गोमुत्रात बेळफळ वाटून त्यात तेल घालून कढवावे, गार झाल्यानंतर तेल गाळून मग कानात घालावे.
२२) सर्पदंश झाल्यावर बेलाचे मूळ, कवठांचे मूळ, तांदुळजाचे मूळ यांचा रस काढून प्यायला द्यावा.
२३) पायांच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर बेलपाने गोमुत्रात खलून ते अनांशापोटी दर आठ दिवसांनी घेतल्यास खूप फरक पडतो.
२४) आमांशामध्ये रक्त पडत असेल तर बेलफळ थोडे भाजून त्यातला थोडा गर काढून त्यात गूळ घालून सकाल, दुपार घेतल्यास बराच आराम वाटतो.
२५) बेलाचे फूल डोळ्यात अंजन म्हणून वापरतात, औषधात कोवळे फळ वापरणं जास्त वापरतात, बेलाच्या पानापासून सुवासिक पाणी मिळते.
२६) फळातल्या गराचे रुचकर सरबत करता येते.
२७) बेलाच्या खोडातून उत्तम प्रतीचा डिंक मिळतो.
२८) सालीमधून पिवळा रंग काढतात.