बॉलिवूडची गॉर्जियस अभिनेत्री आलिया भट्टने तिचा २९ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवशी आलियाने तिच्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं. आलियाचा गंगूबाई काठियावाडी या सिनेमा चांगलचा गाजला. गंगूबाईच्या यशानंतर आलिया आता ब्रम्हास्त्र घेऊन सज्ज झाली आहे. आज आलियाच्या वाढदिवशी ब्रम्हास्त्रचा टीझर फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. आलिया सिनेमात ईशा ही भूमिका साकारणार आहे. सिनेमातील आलियाचा लूक फार अट्रॅक्टिव्ह दिसत आहे.
दरम्यान ब्रम्हास्त्रच्या टीझरमध्ये आलिया फार इंटेंस आणि सिरीयस लूकमध्ये दिसत आहे. आलियाचा हा लूक पाहून सिनेमात आलियाच्या वेगवेगळ्या शेड्स पाहायला मिळणार असे दिसत आहे.