भटक्या विमुक्त जमातीच्या विविध मागण्याकडे शासनाने लक्ष द्यावे – नरेश राठोड

शेंबाळपिंपरी: श्रीरामपूर येथील सुंदल निवास येथे दि.17जुलै 2022रोजी बैठक घेऊन भटक्या विमुक्त जातीतील जबाबदार कार्यकर्तानीं अनेक प्रमुख मागण्यांवर चर्चा करून भटक्या विमुक्तांचा भव्य मेळावा घेण्या बाबत व भटक्या विमुक्त समाजातील पहिले पदमश्री रामसिंगजी भानावत यांच्या 15ऑगस्ट रोजी जयंतीचे आयोजन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.तसेच भटक्या विमुक्तांच्या समस्या, मागण्या व येणाऱ्या जि. प., प. स. निवडणूका, सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडी वर चर्चा करण्यात आली. लवकरच मेळाव्या बाबत पूर्वतयारी साठी सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. आणि दरमहिन्याला भटक्या विमुक्तांच्या लोकांनी महिन्यात एकदातरी जमा होऊन विचारांची देवाणघेवाण करावी असे मत काही कार्यकर्त्यांनी मांडले.

दरम्यान, या प्रसंगी प्रमुख मागण्यातील 1)भटक्या विमुक्त जातीसाठी शासनानीं क्रिमि्लीअर जातक अटी रद्द कराव्या,2)वसंतराव नाईक भटक्या विमुक्त महामंडळाला किमान 10कोटी निधी शासनांनी उपलब्ध करून द्यावा,3)भटक्या विमुक्त जाती तांडा वस्ती सुद्धार योजनेसाठी किमान 10कोटी निधी द्यावा.,4)शासनाच्या शासकीय कमिट्या प्रत्येक जिल्ह्यातील 150असतात त्यामध्ये भटक्या विमुक्तांचा एकतरी सदस्य घ्यावा.5)राज्य स्थरावर शासनाच्या 26-27कमिट्या असतात त्यावर सुद्धा भटक्या विमुक्तांचा आभासू एक तरी सदस्य घ्यावा अशा प्रमुख मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून शासनाचे लक्ष वेधन्यासाठी सर्वतोपारी पर्येंत्न करण्याचे सर्वं कार्यकर्तानां सहभागी होण्याचे अहवान मिटिंगचे अध्यक्ष ऍड.नरेश राठोड यांनी केले. या प्रसंगी श्री. अंकुश राठोड, पारधी समाजाचे श्री.नथू मोरे, गोपाळ समाजाचे श्री. रामराव पवार,श्री.पंजाब चव्हाण रितेश पवार आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.