भटक्या – विमुक्त जमाती प्रर्वगातील पदोन्नती आरक्षण संदर्भात बैठक संपन्न

भटक्या विमुक्त प्रवर्गातील पदोन्नतीच्या संदर्भात मुंबई येथील विधानभवनात बैठक पार पडली. माजी वनमंत्री संजय राठोड, आरक्षणाचे जाणकार हरिभाऊ राठोड, आमदार राजेश राठोड, आमदार तुषार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत समाजाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पदोन्नतीच्या बाबतीत पक्षभेद विसरुन एकसंघ होऊन काम करण्याची गरज आहे असे यावेळी सुनिश्चित करण्यात आले.

दरम्यान, विमुक्त जाती व भटक्या जमाती यांच्या पदोन्नतीतील आरक्षण संदर्भात उपस्थित झालेल्या पेचप्रसंग संदर्भात इतंभूत व सर्व सर्वंकष मुद्दे विचार घेऊन चर्चा करण्यात आली. माननीय सर्वोच्च न्यायालय मध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती यांच्या संदर्भात कोणताही मुद्दा नसून देखील शासनामार्फत अशी भूमिका का घेण्यात आली? याबद्दल विचार मंथन करण्यात आले. तसेच माननीय मुख्य सचिव यांच्या अंतर्गत गठीत समितीने त्यांच्या कार्यकक्षे बाहेर जाऊन जे कामकाज कले आहे ते अनाकलनीय आहे. तसेच, विमुक्त जाती व भटक्या जमाती यांच्या संदर्भात त्यांनी जी शिफारस केली आहे, ती नैसर्गिक न्याय तत्त्वाला धरून नसून, सदर महत्त्वपूर्ण शिफारस व निर्णय घेत वेळी सदर समितीमध्ये या प्रवर्गाच्या कुणीही व्यक्ती नाही अथवा या संदर्भातील ज्या संघटनांनी निवेदन दिले आहेत त्यांना देखील विचारात घेतलेले नाही. त्याचप्रमाणे असा काहीतरी निर्णय घेते वेळी संबंधित प्रवर्गाच्या कुठल्याही संघटनेचे प्रतिनिधी अथवा प्रवर्गाच्या अधिकाऱ्यास विश्वासात घेण्यात आलेले नाही, करिता अश्या अन्यायकारक निखालस खोट्या बाबी सदर अहवालात नमूद असल्याने, सदर अहवालातील विमुक्त जाती व भटक्या जमाती संदर्भातील अनावश्यक मजकूर व शिफारस शासनाने फेटाळणे गरजेचे आहे आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र पवार, ओएसडी नीलेश राठोड, राज राठोड, राजाराम राठोड, राजू चव्हाण, आकाश जाधव, सानिया जाधव, राजेश चव्हाण जालनेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.