भारताने कोविड लसीकरण मोहिमेमध्ये १५० कोटी लसीचे डोस देण्याचा महत्वाचा टप्पा ७ जानेवारी रोजी पार केला आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्वीट्स द्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशबांधवांचे अभिनंदन केले आहे. देशाची लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी, जे परिश्रम करत आहेत, अशा सर्वांचे पंतप्रधानांनी आभार मानले आहेत.
दरम्यान, ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जे सतत परिश्रम करत आहेत अशा सर्व लोकांचा भारत ऋणी राहील. आम्ही आपल्या डॉक्टरांचे, संशोधकांचे, वैज्ञानिकांचे आणि कर्मचाऱ्यांचे आभारी आहोत. माझी सर्व लोकांना विनंती आहे, की त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी. आपण सगळे एकत्रितपणे कोविड-19 विरुद्ध लढा देऊया.” असेही ट्वीट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले.