मुंबई : राज्यभरात मोठ्या प्रमाणात थंडी पडल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा पारा घसरलेला आहे. या थंडीचा परिणाम मुंबईत देखील दिसून येत आहे. मुंबईतील अनेक भागात किमान तापमान 16 अंशांवर पोहोचले आहे. येत्या 1 ते 2 दिवस मुंबईतील गारठा कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासापासून पावसाचं वातावरण होतं. यासोबतच वातावरणात गारवा देखील होता. यामुळे पारा घसरला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.