महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या आकडेवाडीत घट झालेली दिसून येत आहे. पण गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी नव्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. आणि कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही काही प्रमाणात कमी झाली आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासात ३ हजार २८६ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून ५१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ टक्के :
दरम्यान, राज्यातील मागील २४ तासात ३ हजार ९३३ रुग्ण कोरोनावरती मात करून घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ टक्के झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के एवढा आहे.