मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघ आणि कल्पवृक्ष अॅग्रो प्रॉडक्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 4 मे रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, येथे भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंबा महोत्सवात विविध प्रकारचे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले देवगड तसेच रत्नागिरी हापूस एक्सपोर्ट गुणवत्तेचे आंबे, ज्यांचा दर बाजारात रु. 900 प्रति डझन आहे ते, ग्राहकांना या महोत्सवात रु. 800 प्रति डझन या दरात उपलब्ध होणार आहेत. तसेच पत्रकारांना हे आंबे रु. 650 प्रति डझन दरात उपलब्ध होणार आहेत. या महोत्सवात कोकणातील विविध ठिकाणचे आंबा स्टॉलधारक आपल्या बागेतील आंबे ग्राहकांसाठी एकाच मंचावर उपलब्ध करून देणार आहेत. महोत्सवाची वेळ सकाळी 11.00 ते सायंकाळी 7.00 अशी आहे. दरम्यान, या आंबा महोत्सवात एक्स्पोर्ट गुणवत्तेच्या देवगड हापूस आंब्याव्यतिरिक्त हापूस आंब्याचा आमरस देखील विक्रीसाठी उपलब्ध असेल. तसेच कोकणी मेवा म्हणून प्रसिद्ध असलेले खाजा, कोकम, काजूगर, शेंगदाणे लाडू, शेवाचे लाडू, नारळ वडी आदी कोकणी मेवा देखील मिळेल.
तरी सर्व मुंबईकरांनी या आंबा महोत्सवाला भेट देऊन रसरशीत आणि नैसर्गिक आंब्यांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या आंबा महोत्सवाचे उद्घाटन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांच्या शुभ हस्ते उद्या बुधवारी सकाळी 11.00 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांसाठी व पत्रकारांसाठी हे आंबे सवलतीच्या दरात दिले जाणार असून सदस्यांनी अथवा सदस्य नसलेल्या पत्रकारांनी पत्रकार संघात श्री. सुरेश ठुकरुल यांच्याकडून कूपन घेऊन या सवलतीचा लाभ उठवावा, असे आवाहन पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.