राज्यात मान्सूनने गेल्या काही दिवसात, ढगांच्या गडगडाटासह होणाऱ्या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला पण येत्या आठवड्यात परत पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. तर राज्यात ८ ते ९ जुलै नंतर परत पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता भारतीय हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी वर्तवण्यात आली आहे.
होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार – राज्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून सातारा, कोल्हापूर, मुंबई, जालना आणि परभणीमध्ये सर्वाधिक पाऊस झाला असून सर्वात कमी पाऊस अकोला, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये झाला आहे.
याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पुणे, सांगली,पालघर, औरंगाबाद, बीड, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर मध्ये नियमित सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. तर, नाशिक, अहमदनगर, बुलडाणा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, गडचिरोली आणि गोंदियामध्ये सुद्धा समाधानकारक पाऊस झाला आहे असे हवामान विभागाने सांगितले.