राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरु झाले आहे, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली. त्याचवेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला इशाराही दिला आहे. ‘लाऊडस्पीकर काढा नाही तर मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवू’, असे राज म्हणाले.
मशिदीतील लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. याबाबत देशातील अनेक शहरांतून आवाज उठवण्यात आला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी याप्रकरणी महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत. मशिदींच्या लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या गुढी पाडव्याच्या दिवशीच्या भाषणात मशिदींमधील लाऊडस्पीकर बंद करण्याची मागणी केली.