‘रात्रीस खेळ चाले 3’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. म्हणजेच, मालिकेचे नवे एपिसोड प्रेक्षक एन्जॉय करू शकणार आहेत.कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ‘रात्रीस खेळ चाले 3’चे शूट बंद होते. पण आता लवकरच पुन्हा एकदा शूटिंग सुरू होऊन ह्या मालिकेचे नवे एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
लवकरच मालिकेचे शूटिंग सुरु होईल. त्यानंतर मालिका लगेचच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. कोकणात सध्या प्रचंड पाऊस सुरु असल्यामुळे पावसाचा व्यत्यय आहेच; पण मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याची इच्छा आहे. असे या मालिकेच्या लेखकांपैकी एक लेखक प्रल्हाद कुडतरकर यांनी सांगितले आहे.
मालिकेत माधव अभ्यंकर यांनी साकारलेले खलनायक अण्णा नाईक या पात्राने प्रत्येकाच्याच मनात भिती निर्माण केली, तर अपूर्वा नेमळेकर हिने साकारलेल्या शेवंता या पात्राने भुरळ घातली होती.